४१ . पसायदान

 ४१ . पसायदान 

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 

तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो | 

भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । 

जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । 

अनवरत भूमंडळीं । भेटतु  भूतां ॥ ४ ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । 

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । 

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।

 भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । 

दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥

येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । 

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

Comments

Popular posts from this blog

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन

४४ हे शारदे मां अज्ञानता से हमें तार दे माँ

४३ . ॐ जय जगदीश हरे