३ . चला चला बांधु या रे भव्य राम मंदिरा

 ३ .  चला चला बांधु या रे भव्य राम मंदिरा

चला चला बांधु या रे भव्य राम मंदिरा
नयनरम्य मनमोहक बांधु या रे मंदिरा || धृ ० ||

सत्य धर्म न्याय नीती एक राम मंत्र हा
घुमटाच्या खाली मी हाचि राम पाहिला 
वनवासा मधुनि राम राम माझा सुटला 
शतकांच्या तिमिरातून सूर्योदय जाहला
 राम राम राम जय जय राम राम राम
राम राम राम सीता राम राम राम ||१||

पितृ वचन पाळण्या वनवासी जाहला 
युगे युगे सरली पण भोग नाही सुटला 
असुरांचे पतन करूनि सिंहासन भूषविले 
तिन्ही लोकी म्हणून आज राम राम गुंजले
राम राम राम जय जय राम राम राम
राम राम राम सीता राम राम राम ||२||

Comments

Popular posts from this blog

४५ आता विसाव्याचे क्षण

४१ . पसायदान

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन