२० . असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार

 २० . असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार


असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार

तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार ॥धृ०॥

तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची

तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेवी

तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची

तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची

तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरि मिळेल

तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल

तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार ॥३॥ 

Comments

Popular posts from this blog

४५ आता विसाव्याचे क्षण

४१ . पसायदान

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन