४ . महामंत्र हा नवविजयाचा
४ . महामंत्र हा नवविजयाचा
महामंत्र हा नवविजयाचा,
नव्या युगाचा नव पर्वाचा
दाही दिशांतुनी घुमते नाम,
रामप्रभू चे सुंदर नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥धृ.॥
नवे पर्व हे हिंदुत्वाचे,
संघशक्तीचे शिवशक्तीचे
हिंदू मनाचा स्वामी राम,
गंगेसम हे पवित्र नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥१॥
धर्म राखु या इथे निरंतर
खलप्रवृत्ती नुरो धरेवर
पुरुषार्थाचे मंगलधाम
रामप्रभू चे सुंदर नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥२॥
जीर्ण जातसे जेव्हा जळूनी,
नवे येतसे सहज उजळूनी
हिंदूंचे हे सुवर्ण युग ये,
मुखी घेऊनी पवित्र नाम ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥३॥
मंदिर बांधू जन्मभूमी वर,
पराक्रमाने विशाल सुंदर
नवविजयाचा मार्ग दाखवील,
जनशक्तीचा मंत्र महान ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥४॥
लोकशाहीचा आद्य प्रणेता,
सुजनशक्तिचा भाग्यविधाता
हिंदू युगाचा नायक राम,
हिंदूंचा हा पंचप्राण ।
जय श्रीराम जय श्रीराम ॥५॥
Comments
Post a Comment