८ . श्रीरामाच्या जन्मभूमीवर एक वीट घेऊन चला

 ८ .  श्रीरामाच्या जन्मभूमीवर एक वीट घेऊन चला 

श्रीरामाच्या जन्मभूमीवर एक वीट घेऊन चला 
रामशीला घेऊन चला
हिंदुबंधुंनो एकमुखाने रामचंद्रकी जय बोला 
श्रीरामचंद्रकी जय प्रभू रामचंद्रकी जय ।।धृ०।।

आज पुकारे तुम्हां अयोध्या श्रीरामाला मुक्त करा 
मंदिर अपुले मुक्त करा 
रामजन्मभू प्राणप्रतिष्ठा स्वातंत्र्याचा अर्थ खरा 
एकवीट लावूया अपुली सुंदर मंदिर उभवू चला ।।१।।

या देशाच्या एकत्वाचा मानबिंदू हा एक खरा 
पूर्वज लढले ज्याच्यासाठी स्वप्न तयांचे पूर्ण करा 
रामजन्मभू कृष्णजन्मभू काशिनाथ तो मुक्त करा ।।२।।

श्रद्धास्थानांचा अपमान सहन कधी नाही करणार 
तनमन देऊ प्राणही देऊ रामजन्मभूमी घेणार 
मंदिर भव्य उभे करणार 
बाबर तैमूर औरंग्याचे पुसून टाकू नाव चला ।।३।। 

Comments

Popular posts from this blog

४५ आता विसाव्याचे क्षण

४१ . पसायदान

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन