३८ . मानवतेचे मंदिर माझे

 ३८ . मानवतेचे मंदिर माझे


मानवतेचे मंदिर माझे आत लाविल्या ज्ञानज्योती 

श्रमिकहो घ्या इथे विश्रांती ||धृ ०||

बंधुत्वाची येथ सावली अनाथ अमुचे माय माऊली 

कधी दिसे का ईश रावुळी देव ते अंतरात नांदती||१||

आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरीही दारिद्र्याचे 

अभंग ओठी मानवतेचे मृदुंगी वेदनेस विस्मृती ||२||

दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे 

भावभक्तीचे आम्हा साकडे पथिक हे परंपरा सांगती ||३||

Comments

Popular posts from this blog

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन

४४ हे शारदे मां अज्ञानता से हमें तार दे माँ

४३ . ॐ जय जगदीश हरे