१३ . हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
१३ . हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ।।धृ ०।।
कर्तव्यदक्ष भूमी सीता रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे ।।१।।
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे ।।२।।
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळींचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे ।।३।।
Comments
Post a Comment