२८ . दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे

 २८ . दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे


दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे ।।धृ०।।

इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिक रम्य शुभंकर हे ।।१।।

चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तिचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब अम्ही तर सागर हे ।।२।।

त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे ।।३।।

Comments

Popular posts from this blog

४५ आता विसाव्याचे क्षण

४१ . पसायदान

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन