२७ . निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

 २७ . निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई


निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही ।।धृ०।।

गाय झोपली गोठयात घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई ।।१।।

देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई ।।२।।

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई ।।३।।

Comments

Popular posts from this blog

४५ आता विसाव्याचे क्षण

४१ . पसायदान

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन