१६ . राधेकृष्ण गोपालकृष्ण
१६ . राधेकृष्ण गोपालकृष्ण
राधेकृष्ण गोपालकृष्ण ।।धृ०।।
कान्होबाच्या संगती ब्रम्हादिक इच्छिती
धन्य आम्हां म्हणती महां हां हां हां हां ।।१।।
यमुनेच्या तीरी चेंडू खेळे वनमाळी
कृष्ण बुडाला यमुनाजळीं अरे रे रे रे रे ।।२।।
अजगर मारिला वणवाही ग्रासिला
गोवर्धन उचलिला अब ब ब ब ब ।।३।।
मामा मारू गेलासी आपटिले गजासी
दोन वृक्ष उन्मळीसी अलू लू लू लू लू ।।४।।
ऐसे तुझे पवाडे ब्रह्मादिक झाले वेडे
विष्णुदास नामा म्हणे अहा हा हा हा हा ।।५।।
Comments
Post a Comment