२६ . अनादि गणपती स्वामी

 २६ . अनादि गणपती स्वामी

अनादि गणपती स्वामी चिंतामणी देवा 
विद्याधर तुज म्हणती करिती सुरसेवा 
नकळे ब्रह्मादिकां पार्वतीसुत यावा 
भावा गावा ध्यावा मुनिमानस द्यावा 
जयदेव जयदेव जय गणपती स्वामी 
पंचप्राणे आरती करितो तुजला मी ।।धृ०।।

परशांकुश कमला धरूनि अवलिला 
शेंदूर चर्चित भाळा शोभे रिपु काळा 
तनुरांकृत ज्वाळा ज्वाळांकृत भाळा 
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ।।१।।

राजस सुंदर उंदीर ठुमक ठुमक चाले 
हालत मालत डोलत लंबोदर आले 
ध्यानी ध्याता दास सज्जन मुनी ध्याले 
अगणित गुण गण वर्णित जनुपंडित बोले ।।२।।

Comments

Popular posts from this blog

४५ आता विसाव्याचे क्षण

४१ . पसायदान

४० . जिनके ओजस्वी वचनों से, गूँज उठा था विश्व गगन